यादव राजांचे पंतप्रधान हेमाद्रिपंत यांच्या हस्ते माता रत्नेश्वरीचे मंदिर बांधकाम किंवा मुर्तीची प्रतिस्थापना साधारणतह तेराव्या शतकाचे शेवटचे दशक व चौदाव्या शतकाचे पहिले दशक या दरम्यान झाले असावे. कारण त्यानंतर यादव राजांची सत्ता संपुस्ठात आली. तेन्ह्वापासून म्हणजे जवळ जवळ सातशे वर्षे माता रत्नेश्वरीचे वास्तव्य इथे आहे.
१९५० साली कनेह्यादास नावाचा साध इथे आला आणि पहिल्ल्यांदा इथे मुक्कामाला राहिला आणि इथेच रमला. लोकांच्या ही गोष्ठ लक्षात आल्यावर वडेपुरीचे ग्रामस्थ तिथे गेले आणि साधु महाराजाची विचारपूस केली. साधूने काही दिवस अनुस्थाण केले मग लोकांच्या सहकार्याने या साधूने देवीच्या उजव्या बाजूस एका धर्मशाळेचे बांधकाम केले. कनेह्यादास साधुच्या वास्तव्यामुळे देवीच्या मंदिरात येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली व महारांजाचे महत्व वाढू लागले.
पुढे १९६५-६६ साली गोविंद महाराज मंगनाळीकर देवीच्या मंदिरात आले आणि त्यांनी या ठिकाणी पहिले कीर्तन केले व लोकांना देवीचे महत्व सांगून नवरात्र महोत्सव साजरा करण्यास प्रवृत केले.१९८० सालापासून गावकरी मंडळींनी मिळून नवरात्र महोत्सवास व्यवस्तीत स्वरूप दिलं.
४ जून १९९६ रोजी विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली आणि अध्यक्ष श्री. दिगंबरराव धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने १९९७ साली जानेवारी महिन्यात शतचंडी यज्ञाचे आयोजन केले. यावेळी अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचने किर्तने असा भरगच्च कार्यक्रम झाला. मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात आले. महाप्रसादाने या शतचंडी यज्ञाची सांगता झाली.
१९९८ सालच्या नवरात्र महोत्सवातून जमलेल्या निधीतून नवरात्र उत्सव संपताच नवीन बांधकामाची सुरवात झाली. बांधकामाच्या सुरुवातीला माता रत्नेश्वरीच्या प्रांगणात सुंदर तुलसी वृंदावन बांधून नवीन बांधकामाचा शुभारंभ केला. जुन्या धर्मशाळेच्या समोर मंदिराच्या उजव्या बाजुस सभा मंडप बांधला व पायऱ्याची दुरुस्ती केली. दोनशे ते अडिचशे लोक मावतील असा सभामंडप बांधला त्यामुळे कीर्तन-प्रवचनाला प्रशस्थ जागा मिळाली.