आरती

जयदेवी जयदेवी जय रत्नेश्वरी माता |
तुझे गुण गाता हरती भव भय-चिंता || जय देवी
वडेपुरी ग्रामी जन्म घेतला |
साऱ्या गावाला लळा लावला ||
जमवूनी मैत्रिणी खेळ मांडला |
वाळुचा करुनी महादेव पूजिला || जय देवी ||
नागराजाशी खेळ मांडला |
पाहून मातेचा जीव घाबरला ||
करून ईशारा त्याला पळविला |
लक्ष्मीमातेला हुंदका फुटला || जय देवी ||
पळता राजाई पडली विहिरीत |
तरंगण्या तिला दिला तू हात ||
जमलेली मंडळी अचंबीत झाली |
तुझ्या देवत्वाची खुण पटली || जय देवी ||
पाहुण्या मारण्या चंद्रा सरसावला |
पडून मध्ये तू त्यासी अडविला ||
त्रिशुळ दाऊनी त्यासी नमविला |
गुडघे टेकवूनी शरण तो आला || जय देवी ||
डोंगरावरती पिंडी स्थापूनी |
मनोभावे तिची पूजा करूनी ||
भल्या पहाटे श्रावणमासी |
महिनाभर शंकर पूजिला || जय देवी ||
डोंगरावरती माते तू ठाण मांडले |
त्रिशूळ मारूनी पाणी काढले ||
हिरवट नितळ पाण्याने कुंड भरले |
साऱ्या भक्तांना रोगमुक्त केले || जय देवी ||
वर्षे सातशे उभी तू भक्तांच्या पाठी |
मनोभावे तूज पूजिता होते कृपादृष्टी || जय देवी ||

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys